एक्स्प्लोर

टीम इंडियाचा पुढचा अश्विन कोण? उत्तर मिळालं; मुंबईचा 26 वर्षीय ऑफ स्पिनर भारतीय संघात  

Tanush Kotian : मुंबईचा ऑफ स्पिनर आणि अष्टपैलू तनुष कोटियनचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. 

मुंबई : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन ब्रिस्बेन कसोटीनंतर निवृत्त झाला. अनिल कुंबळे, हरभजन सिंगनंतर भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा गेली १४ वर्ष अश्विननं यशस्वीपणे सांभाळली. कुंबळे आणि भज्जीचा वारसा पुढे नेला. पण अश्विनच्या निवृत्तीनंतर आता कोण? हा प्रश्न अनेकांना पडला होता. देशांतर्गत क्रिकेट आणि खासकरुन मुंबईचे सामने पाहणाऱ्या क्रिकेटरसिकांना याचं उत्तर काय असेल याची जाणीव आधीच होती. बॉर्डर-गावस्कर मालिकेतल्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात जेव्हा अश्विनऐवजी एका मुंबईकर खेळाडूची निवड झाली तेव्हा क्रिकेटरसिकांचा तो अंदाज खरा ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न आणि सिडनीतल्या कसोटीसाठी अश्विनच्या जागी रोहित शर्माच्या भारतीय संघात निवड समितीनं संधी दिली ती मुंबईच्या तनुष कोटियनला. 

Who Is Tanush Kotian : कोण आहे तनुष कोटियन?

तनुष कोटियन. २६ वर्षांचा तनुष सध्याच्या मुंबई संघाचा अविभाज्य भाग. रणजी असो किंवा मर्यादित षटकांचे सामने कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅचविनिंग कामगिरी करणारा मुंबईचा हुकमी एक्का अशी तनुषची ओळख बनली आहे. २०२३-२४ च्या मोसमात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईनं सात आठ वर्षांचा रणजी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्या अख्ख्या मोसमात केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही चमक दाखवून तनुषनं रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

मुंबईनं इराणी करंडक आणि नुकतीच सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकली. संघाच्या या यशातही तनुषची फिरकी प्रभावी ठरली. कामगिरीतलं कमालीचं सातत्य, मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देण्याची क्षमता आणि तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन केलेल्या 'मॅचविनिंग' खेळी यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघातही तनुषची निवड झाली होती.

तनुषचं डोमेस्टिक रेकॉर्ड

तनुष कोटियननं मुंबईकडून खेळताना प्रथम दर्जाच्या ३३ सामन्यांमध्ये २५.७०च्या सरासरीनं १०१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं या कालावधीत दोन शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. तनुषची याच कामगिरीनं त्याला आता टीम इंडियाच्या सिनियर टीमची दारं खुली झाली आहेत. अश्विन निवृत्त झाल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या ऑफ स्पिन गोलंदाजांची बीसीसीआयनं चाचपणी केली. पण बीसीसीआयनं तनुषवर विश्वास टाकत टीम इंडियात स्थान दिलं.

विक्रोळीचा तनुष टीम इंडियात

तनुष मूळचा मुंबईच्या विक्रोळीचा. वडील करुणाकर कोटियन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच. क्लब क्रिकेट, एज ग्रुप क्रिकेट ते रणजी करंडक अशी एकेक पायरी चढत तनुष आज भारतीय संघात दाखल झाला आहे. एमसीएच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन या क्लबचं तनुष प्रतिनिधित्व करतो. कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये पाच वर्षांपूर्वी रुट मोबाईल संघाकडून तनुषला संधी मिळाली. त्यानंतर गेली काही वर्ष तो इनकम टॅक्स संघाकडून टाईम्स शील्ड सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये खेळतोय.

संधी मिळाली, आव्हान मोठं

२०१० साली रवीचंद्रन अश्विन टीम इंडियात दाखल झाला तेव्हा तो २४ वर्षांचा होता. तनुषही फक्त २६ वर्षांचा आहे. संधी मोठी आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं दडपणही तितकच असेल. पण तनुष मुंबईकर आहे. आणि क्रिकेटच्या मैदानात मुंबईकर खेळाडू हा खडूस मानला जातो. त्यामुळे आता तनुषला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा खडूसपणा सिद्ध करावा लागेल. मेलबर्न, सिडनी वाट पाहतंय...

 

महत्त्वाच्या बातम्या

माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Commonwealth Games 2026 : भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget