Team India Captain Rohit Sharma Selfie : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने (Team India) टी20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024 Trophy) नाव कोरलं. भारताने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सात धावांनी जिंकून विश्वचषक जिंकला. 17 वर्षांची प्रतीक्षा संपवून टीम इंडियाने 2007 नंतर विश्वचषक जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली, याचं फळ भारताला मिळालं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठताच T20 विश्वचषकाची ट्रॉफी पलंगा शेजारी पाहत रोहित शर्माची सुप्रभात झाली.
टी20 विश्वचषकासह हिटॅमनची सुप्रभात
विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा अंथरुणावर झोपलेला दिसत आहे, तर त्याच्या शेजारी टी20 विश्वचषकाची ट्रॉफी दिसत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्यांच्या शेजारी T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी होती. हा अनमोल क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
कर्णधार रोहित शर्मानं शेअर केला ट्रॉफीसोबतचा फोटो खास फोटो
रोहित शर्माची टी20 क्रिकेटमधून निवृत्ती
भारत विश्वविजेता बनल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी विराट कोहलीनेही टी20 फॉरमॅटचा निरोप घेतला. रोहित शर्माच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला. टी20 विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर पहिल्यांदा विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आणि त्यानंतर काही वेळाने कर्णधार रोहित शर्माने मीडियासमोर निवृत्तीची घोषणा केली. हा भारतासाठी दुहेरी धक्का होता.
रोहित शर्मा कसोटी आणि वनडे खेळणार
आपल्या निवृत्तीबाबत रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितलं की, "ही माझी शेवटची टी20 मॅच होती. जेव्हापासून मी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मी खूप एन्जॉय केलं. या फॉरमॅटला निरोप देण्यासाठी माझ्याकडे यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. त्यातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला."
महत्त्वााच्या इतर बातम्या :