T20 World Cup Ind Vs Pak: रोहित शर्माच्या अंगठ्यावर आदळला चेंडू; भारत-पाकिस्तानाच्या सामन्याआधी वाढलं टेन्शन, पाहा Latest Updates
T20 World Cup Ind Vs Pak: सराव करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
T20 World Cup Ind Vs Pak: T20 विश्वचषक 2024 मधील (ICC T20 World Cup 2024) भारत विरुद्ध पाकिस्तानचा (Ind Vs Pak) सामना उद्या म्हणजेच 9 जून रोजी होणार आहे. हा मेगा सामना T20 विश्वचषक 2024 मधील 19 वा सामना आहे, जो न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.
सराव करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सराव करताना रोहित शर्माच्या अंगठ्यावर चेंडू लागला, त्यानंतर संघाचे फिजिओ लगेच त्याच्याकडे पोहोचले. चेंडू आदळल्यानंतर रोहितने अंगठ्याकडे पाहिले आणि फिजिओने त्याची तपासणी केली. रोहितच्या या दुखपतीनंतर टीम इंडियाचं टेंशन वाढलं होतं. मात्र तपासणीनंतर कर्णधार पूर्णपणे बरा झाला आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला. अशा स्थितीत तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.
रोहित शर्माची आयर्लंडविरुद्ध दमदार कामगिरी-
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने 37 चेंडूत 52 धावा केल्या होत्या, मात्र उजव्या खांद्यावर चेंडूचा फटका बसल्याने त्याला 10व्या षटकानंतर मैदान सोडावे लागले.
न्यूयॉर्कमधील खराब स्टेडियमवर आयसीसीचे विधान
भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याच्या एका दिवसानंतर, आयसीसीने गुरुवारी एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे- "नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे नाहीत."उर्वरित सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करता येईल", असंही आयसीसीने म्हटलं आहे.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.
भारताचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद
पाकिस्तानचा संपूर्ण संघ-
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, उस्मान खान