T20 World Cup fallout: टी-20 विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल होण्याची दाट शक्यता होती. यातच भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं शुक्रवारी (18 नोव्हेंबर) संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त (Selection Committee) करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच नव्या निवडसमितीसाठी तातडीनं अर्ज देखील मागवले आहेत. पण बीसीसीआयनं तडकाफडकी संपूर्ण निवड समितीच बरखास्त का केली? यामागचे पाच मोठे कारण जाणून घेऊयात.
दरम्यान, 24 डिसेंबर 2020 रोजी बीसीसीआयनं चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला होता. सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले होते. पण आता बीसीसीआयने एकाही सदस्याला कायम न ठेवता सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
1) वर्षभरात आठ खेळाडूंना कर्णधारपद
वर्षभरात चेतन शर्मा आणि त्याचे पॅनल टीम इंडियाला स्थिर संघ देऊ शकले नाही. मागील एक वर्षात भारतीय संघाच्या आठ खेळाडूंना कर्णधारपद देण्यात आलं होतं. टी-20 विश्वचषकापूर्वीही संघ संयोजनाबाबत सातत्यानं प्रयोग केले जात होते. अशा स्थितीत भारतीय संघाला एक परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन तयार करता आली नाही.
2) केएल राहुलचं संघात पुनरागमन
आठ महिन्यांच्या मोठ्या स्पर्धांनंतर लगेचच केएल राहुलला संघात आणण्यासारखे निर्णयही टीकेचे धनी ठरले. केएल राहुल त्याच्या पुनरागमनानंतर मोठ्या सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला.
3) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळलं
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चेतन आणि त्यांच्या टीमनं संधी दिली नाही. टी-20 विश्वचषक संघासाठी त्यांनी काही निवडक खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांची निवड केली.
4) वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंना विश्रांती
वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंना पर्यायी ब्रेक देण्याच्या त्यांच्या निर्णयांवरही सातत्यानं टीका होत आहे.
5) शिखरन धवनबाबतही मोठा प्रश्न उपस्थित
शिखर धवनला वनडे संघात सतत संधी दिली जात आहे. तो सतत एकदिवसीय संघाचा कर्णधार बनत आहे. तो 37 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत तो पुढील विश्वचषकासाठी भारतीय संघात असेल की नाही हे स्पष्ट नाही, असे अनेक मुद्दे चेतन शर्मा आणि त्यांच्या पॅनलच्या निर्णयांमुळं उपस्थित होत आहेत.
नवीन निवडकर्त्यांवर कोणती मुख्य जबाबदारी असणार?
- प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
- मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
- संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
- योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा
हे देखील वाचा-