T20 World Cup 2024 Team India Celebration: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली (Virat Kohli) सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. यावेळी जेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी जाताना रोहित शर्माने केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जेतेपदाची ट्रॉफी घेताना रोहित शर्माच्या अंगात लियोनल मेस्सीचं भूत संचारलं होतं, असं म्हटलं वावगं ठरणार आहे. मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 










राहुल द्रविडचं अनोखं सेलिब्रेशन-


विश्वचषकाची ट्रॉफी रोहितने हाती घेतल्यानंतर सर्व खेळाडू ती ट्रॉफी घेऊन आनंद व्यक्त करत होते. याच दरम्यान जेतेपदाची ही ट्रॉफी विराट कोहलीच्या हाती आली. त्यानंतर त्याने लगेच ती राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या हातात दिली. राहुल द्रविड नेहमी शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी हातात येताच राहुल द्रविड खूप आनंदी झाले. तसेच त्यांनी भन्नाट सेलीब्रेशन देखील केले. राहुल द्रविड यांचे हे रुप कधीच पाहिले नसेल. यानंतर भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला उचलून धरले. 


विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब- 


टीम इंडियाचे सर्वात मोठे योगदान फलंदाजीचे होते. संपूर्ण विश्वचषकात अनुभवी विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण जिथे गरज होती तिथे विराट कोहलीने शानदार खेळी करत टीम इंडियाला अशा एकूण धावसंख्येवर नेलं की जिथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. विराट कोहलीच्या 76 धावांच्या शानदार खेळीमुळे विराट कोहलीला सामनावीराचा किताबही देण्यात आला.


संबंधित बातम्या:


विश्वषचक हातात धरताच जंटलमन राहुल द्रविडचा शांत आवेश झटक्यात बदलला; सेलिब्रेशन पाहून सगळेचं पाहत राहिले


Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....


T20 World Cup 2024 Final: बुमराहचं षटक अन् सूर्यकुमारचा अफलातून झेल; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट, Video