T20 World Cup 2024 Rahul Dravid Celebration: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली (Virat Kohli) सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


विश्वचषकाची ट्रॉफी रोहितने हाती घेतल्यानंतर सर्व खेळाडू ती ट्रॉफी घेऊन आनंद व्यक्त करत होते. याच दरम्यान जेतेपदाची ही ट्रॉफी विराट कोहलीच्या हाती आली. त्यानंतर त्याने लगेच ती राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या हातात दिली. राहुल द्रविड नेहमी शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी हातात येताच राहुल द्रविड खूप आनंदी झाले. तसेच त्यांनी भन्नाट सेलीब्रेशन देखील केले. राहुल द्रविड यांचे हे रुप कधीच पाहिले नसेल. यानंतर भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला उचलून धरले. 


राहुल द्रविड यांचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ- (Rahul Dravid Team India Celebration Video)






राहुल द्रविड यांच्या प्रयत्नांना यश-


भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी निरोपाची ही अप्रतिम भेट ठरली. नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय संघात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंमध्ये ताळमेळ बसवून ड्रेसिंग रुममधील वातावरण हसता ठेवण्याचा राहुल द्रविड यांनी प्रयत्न केला. याच प्रयत्नांना आज यश मिळाले. 


रोहित शर्माने मातीचे कण तोंडात घातले-


सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला. रोहित शर्मासह सर्वंच खेळाडूंना आनंदाश्रू अनावर झाले. यावेळी रोहित शर्माने अंतिम सामना ज्या खेळपट्टीवर खेळवला गेला, त्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवर बसून मातीचे कण तोंडात घातले आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला.  आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहे. 


विराट अन् रोहित निवृत्त


भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. तब्बल  17 वर्षानंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयासह भारतीय क्रिकेटमधील दोन महान क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय  टी 20  कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. विराट कोहलीनं  मॅच संपल्यानंतरच निवृत्तीचे संकेत दिले होते. रोहित शर्मानं यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Final: जसप्रीत बुमराह ठरला टी-20 विश्वचषकाचा 'Player Of The Tournament'; पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक


T20 World Cup 2024 Final: बुमराहचं षटक अन् सूर्यकुमारचा अफलातून झेल; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट, Video