T20 World Cup 2024 SA vs BAN: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत काल दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश (South Africa vs Bangladesh) यांच्यात सामना खेळवण्यात आला. यासामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 5 षटकांमध्ये अत्यंत चुरशीने गोलंदाजी केली, ज्यात त्यांनी केवळ 30 धावा दिल्या. प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 113 धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी 79 धावांची भागीदारी केली. क्लासेनने 46 आणि मिलरने 29 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. 


दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तर तौहीद हृदोयने आणि महमुदुल्लाह यांच्यात 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. बांगलादेशकडून तौहीदने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 34 चेंडूत 37 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या तगड्या गोलंदाजीमुळे त्यांचा 4 धावांनी विजय निश्चित झाला.


सामना कसा होता?


बांगलादेशसमोर 114 धावांचे लक्ष्य होते, मात्र दुसऱ्याच षटकात 9 धावा करणाऱ्या तनजीद हसनच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेकडून भेदक गोलंदाजी होती, त्यामुळे पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशला केवळ 29 धावा करता आल्या. पण लिटन दासही 7व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 9 धावा काढून बाद झाला. शाकिब हसनने 3 तर कर्णधार नझमुल हुसेन शांतोने 14 धावा केल्या. अशाप्रकारे संघाने 50 धावात 4 विकेट्स गमावल्या. बांगलादेशने 10 षटकांत 4 गडी गमावून 50 धावा केल्या होत्या. तौहीदने आणि महमुदुल्लाह यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि त्यांनी मिळून संघाची धावसंख्या 15 षटकांत 83 धावांपर्यंत नेली. 


दरम्यान, 17व्या षटकात महमुदुल्लाहविरुद्ध पायचीतचे अपील करण्यात आले होते, परंतु डीआरएसनंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले. सामना बहुतांशी बांगलादेशच्या ताब्यात होता, मात्र 18व्या षटकात रबाडाने तौहीदची विकेट घेत 37 धावांवर त्याला माघारी पाठवले. शेवटच्या 2 षटकात बांगलादेशला विजयासाठी 18 धावांची गरज होती. बांगलादेशला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या 4 चेंडूत 7 धावांची गरज असताना एक चेंडू निर्धाव गेला. मग 3 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. एक धाव काढल्याने बांगलादेशला 2 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. पुढचा चेंडू निर्धाव गेल्याने अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला एका षटकाराची गरज होती. मात्र, सामन्यातील शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् दक्षिण आफ्रिकेने पाच धावांनी विजय मिळवला.






कागिसो रबाडाने फिरवला सामना-


वास्तविक, बांगलादेशला शेवटच्या 3 षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. पण 18व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करायला आला, ज्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर 37 धावांवर असलेला फलंदाज तौहीदला बाद केले, तसेच या षटकात फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे बांगलादेशी फलंदाजांवर दबाव आला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात बांगलादेशचे फलंदाज झटपट बाद झाले. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: न्यूझीलंडसह तीन मोठे संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर; अफगाणिस्तान, अमेरिकेची दमदार कामगिरी


T20 World Cup 2024 Ind vs Pak: नाणेफेकीच्यावेळी गोंधळ, नाणं खिशात पण...; रोहितचा विसरभोळेपणा पाहून बाबर आझमही खळखळून हसला, Video


T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी