T20 World Cup 2024 IND vs AFG: भारतीय संघ  टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला सुपर-8 फेरीचा सामना खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. बार्बाडोसमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भारतीय खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले. पण भारतीय खेळाडूंनी हातावर काळ्या पट्टी बांधण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?


आज माजी क्रिकेटर डेव्हिड जॉन्सनने आत्महत्या केली. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी अफगाणिस्तानविरुद्ध त्यांच्या मनगटावर काळ्या पट्ट्या बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली. डेव्हिड जॉन्सन हे अंदाजे 53 वर्षांचे होते. भारतीय संघात डेविड जॉनसन यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये खेळत होते. डेविड जॉनसन यांच्या टोकाच्या पावलामुळं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. डेविड जॉनसन यांनी हे पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलं नाही. 


डेव्हिड जॉन्सनच्या आत्महत्येनंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने पोस्ट केली आहे. ज्या पोस्टमध्ये त्यांनी डेव्हिड जॉन्सनची आठवण काढली. या खेळाडूने 10 ऑक्टोबर 1996 रोजी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. तर डेव्हिड जॉन्सनने 26 डिसेंबर 1996 रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर ते कधीही टीम इंडियासाठी खेळले नाही.






अनिल कुंबळे काय म्हणाले?


डेविड जॉनसन यांनी 1996 मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते. डेविड जॉनसन यांच्या निधनानं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.  अनिल कुंबळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन माझा क्रिकेटमधील सहकारी डेविड जॉनसन याच्या निधनाची बातमी दु:खद असल्याचं म्हटलं. डेविड जॉनसन यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना अनिल कुंबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. डेविड जॉनसन यांच्यासाठी टोपणनाव बेन्नी वापरत लवकर निघून गेला, असं म्हटलं आहे. 


भारताची Playing XI: 


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.


अफगाणिस्तानची Playing XI:


रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 IND vs AFG: भारत अन् अफगाणिस्तानच्या सामन्यात पावसाची बँटिंग?; बार्बाडोसमध्ये याआधी रद्द झाला होता एक सामना


Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?