T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय; सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह चमकले
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
T20 World Cup 2024 IND vs AFG: अफगाणिस्तानला सहावा धक्का बसला आहे. नजीबुल्ला झदरनला बुमराहने बाद केले.
T20 World Cup 2024 IND vs AFG: फगाणिस्तानला चौथा धक्का बसला आहे. गुलबदिन नायब 21 चेंडूत 17 धावा करत झेलबाद झाला. कुलदीप यादवने त्याला बाद केले.
T20 World Cup 2024 IND vs AFG: सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने 28 चेंडूत 53 धावा केल्या.
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताने 5 षटकांत 1 विकेट गमावत 34 धावा केल्या.
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 8 धावा करत झेलबाद झाला.
T20 World Cup 2024 IND vs AFG: रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी
T20 World Cup 2024 IND vs AFG: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ एक बदलसह मैदानात उतरला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी रोहित शर्माने फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली आहे. कुलदीप यादव यंदाच्या टी २० विश्वचषकातील पहिलाच सामना आज खेळणार आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीवर नजर टाकली तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
पार्श्वभूमी
T20 World Cup 2024 IND vs AFG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024)च्या स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -