T20 World Cup 2024: भारतीय संघाचे सर्व खेळाडू 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आयीसीसी T20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी अमेरिकेला पोहोचले आहेत. तिथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाने नेट सरावही सुरू केला आहे. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) न्यूयॉर्कमध्ये सुविधांच्या कमतरतेमुळे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. आयसीसीने दिलेल्या सुविधांबाबतही अनेक खेळाडू समाधानी नाहीत.


टीम इंडियाची नेमकी तक्रार काय?


टीम इंडियाला नासाऊ काउंटीमधील गार्डन सिटी व्हिलेजमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे आणि कँटिग पार्कमध्ये सरावाची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधा मध्यम दर्जाच्या असून त्या कायमस्वरूपी तयार करण्यात आल्या नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. याशिवाय, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सरावाची सोय नाही, जिथे संघाला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. म इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे कारण 1 जून रोजी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यापर्यंत त्यांना कॅन्टीग्यू पार्कमध्ये सराव करावा लागणार आहे. 






भारतीय संघाचे T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक


भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-20श्वचषकात पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 9 जूनला भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. 12 जूनला भारताचा सामना अमेरिकेशी होणार असून शेवटचा सामना 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.


टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल-


आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.


मोफत पाहता येणार टी-20 विश्वचषकाचा थरार-


वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. 


जय शहा यांनी सेमीफायनलसाठी कोणती 4 संघ निवडली?


टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदासाठी जय शहा यांनी 4 संघांची नावं घेतली आहे. यामध्ये पहिलं नाव भारताचं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. भारत व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज प्रबळ दावेदार असू शकतात, असं जय शहा यांनी सांगितले. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे मोठे संघ असल्याचं जय शहा म्हणाले. दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये दोनवेळा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे, तर ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी-20 विश्वचषक पटकावलं होतं. मात्र जय शहा यांनी वेस्ट इंडिज संघाचं नाव घेतल्याने अनेक क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या