नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती घेतलेल्या दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) मोठं वक्तव्य केलं आहे. दिनेश कार्तिकनं हार्दिक पांड्यानं केलेल्या स्लेजिंगचा अनुभव क्रिकबझसोबत बोलताना शेअर केला आहे.


दिनेश कार्तिकनं आरसीबीच्या आयपीएल 2024 मधील प्लेऑफमधील पराभवानंतर निवृत्ती जाहीर केली होती. दिनेश कार्तिकच्या करिअरमध्ये त्याला अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं होतं. दिनेश कार्तिकनं क्रिकबझ सोबत बोलताना आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याकडून मिळालेल्या वाईट अनुभवाची माहिती दिली. 


हार्दिक पांड्याकडून स्लेजिंग : कार्तिक


दिनेश कार्तिकनं सांगितलं, "हार्दिक पांड्यानं मला स्लेज केलं,'अभी लेगस्पिनर आया, इसका थँक्यू ही है'यानंतर मी चांगले शॉट खेळल्यानंतर हार्दिक म्हणाला , 'ठीक है, थोडा इम्प्रुव्ह होगया लग रहा है' हे चागलं आहे. तो चांगला मित्र आहे, तो 'कमेंटटर बनके भी  थोडा काम कर रहा है'ती मजा होती. रोहित शर्मा देखील टाँटिंग करत होता, मला आशा दाखवत होता," दिनेश कार्तिकनं म्हटलं. 


दिनेश कार्तिकनं विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याचं म्हटलं. आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीकडून खूप प्रेम मिळाल्याचं म्हटलं. याशिवाय महेंद्रसिंह धोनीनं मी तुझ्या कॉमेंट्रीचा आनंद घेतो, असं म्हटल्याचं देखील कार्तिकनं सांगितलं. धोनीकडून झालेलं हे आपलं मोठं कौतुक असल्याचं कार्तिकनं सांगितलं. 


दिनेश कार्तिकनं आरसीबीसाठी दमदार कामगिरी केली होती. दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात 187.36 च्या स्ट्राइक रेटनं 326 धावा केल्या होत्या. आरसीबीचा एलिमिनेटर मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दिनेश कार्तिकनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली. 


दिनेश कार्तिक सध्या आयसीसीच्या कमेंटटर्स म्हणून टी-20 वर्ल्ड कपमध्ये काम करताना पाहायला मिळेल. दिनेश कार्तिकनं यापूर्वी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कॉमेंट्री केलेली आहे. दिनेश कार्तिकनं आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये समालोचन करताना पाहायला मिळेल. 


दरम्यान, भारतीय संघ टी -20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं काल सराव सत्रात सहभाग घेतला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना 1 जूनला होणार आहे. भारताची टी-20 वर्ल्ड कपची मोहीम प्रत्यक्ष 5 जूनपासून सुरु होईल. भारत आणि आयरलँड यांच्यातील मॅच 5 जूनला होईल. यांनतर 9 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. पुढे 12 जूनला भारत अमेरिका, 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल. 


संबंधित बातम्या : 


टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी


T20 World Cup मध्ये सर्वाधिक धावा कोण करणार? हेडन, कैफ आणि श्रीसंतने सांगितला अंदाज