सेंट लूसिया  : टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 पूर्वीची शेवटची मॅच वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान (WI vs AFG) यांच्यात सुरु आहे. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान (Rashid Khan) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राशिद खानच्या अंगलट आला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. ही मॅच सेंट ल्यूसियाच्या डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. वेस्ट इंडिजला किंगच्या रुपात पहिला धक्का बसला. किंग 7 धावा करुन बाद झाला. आझमतुल्लाह ओमरझाईनं (Azamtullah Omarzai) ही विकेट काढली. निकोलस पूरनसमोर ओमरझाई अपयशी ठरला. डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन (Nicholas Pooran) फलंदाजी करत होता. ओमरझाईनं या ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या. 



निकोलस पूरननं आझमतुल्लाह ओमरझाईच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार मारला. यानंतर दबावात आलेल्या ओमरझाईनं नो बॉल टाकला. त्यावर निकोलस पूरननं चौकार मारला. यानंतर ओमरझाईनं पुढचा बॉल वाईड टाकला  हा बॉल सीमारेषेबाहेर गेल्यानं वेस्ट इंडिजला चार धावा मिळाल्या.  यानंतर पुढच्या बॉलवर निकोलस पूरनला रन काढता आली नाही. निकोलस पूरनच्या तिसऱ्या बॉलवर वेस्ट इंडिजला लेग बाय च्या 4 धावा मिळाल्या. 


निकोलस पूरननं आझमतुल्लाह ओमरझाईच्या चौथ्या बॉलवर चौकार मारला.यानंतर निकोलस पूरननं पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सिक्स मारला. या ओव्हमरध्ये वेस्ट इंडिजला 36 धावा मिळाल्या.



निकोलस पूरन आणि  जे चार्ल्स या दोघांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करुन दिली. वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावा केल्या. वेस्ट इंडिजनं सहा ओव्हरमध्ये एक विकेटवर 92 धावा केल्या.  



अफगानिस्तानची टीम 


रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, गुलबदीन नैब, आझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान (कॅप्टन), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी  


वेस्टइंडिजची टीम 


ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मॅक्कॉय


दरम्यान, आजच्या मॅचचा सुपर 8 मधील स्थानावर काही परिणाम होणार नाही. सुपर 8 च्या लढतींना उद्यापासून सुरुवात होणार आहे.  अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर 8 ची पहिली मॅच असेल. 


संबंधित बातम्या : 



Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!