T20 WC 2024: टी-20 विश्वचषकासाठी एस. श्रीसंतने निवडला 15 जणांचा संघ; IPL मधील सर्वात घातक गोलंदाजाचंही नाव!
S. Sreesanth Picks Team India For T20 WC 2024: आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू त्यांनी केलेल्या 15 जाणांचा संघ जाहीर करत आहे.
S. Sreesanth Picks Team India For T20 WC 2024: सध्या आयपीएल 2024 चा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतासह अनेक विदेशी खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. आयपीएलचा हंगाम संपताच आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ( T20 WC 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
विश्वचषकाच्या या स्पर्धेत भारतीय संघाचा (Team India) पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जूनला होईल. तर भारताचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू त्यांनी केलेल्या 15 जाणांचा संघ जाहीर करत आहे. याआधी संजय मांजरेकर, इरफान पठाण यांनी निवडलेला 15 जणांचा भारतीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. यानंतर आता एस. श्रीसंत याने देखील 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीनं प्रभावीत करणाऱ्या मयंक यादवचा देखील यामध्ये समावेश केला आहे. (S. Sreesanth Picks Team India For T20 WC)
एस. श्रीसंतने विश्वचषकासाठी निवडलेला 15 जणांचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, शिवम दुबे, मयंक यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर)
The countdown to #T20WC2024 is 🔛, and #IncredibleStarCast icon @sreesanth36, has revealed his 15 for the #VisaToWorldCup!
— Star Sports (@StarSportsIndia) April 27, 2024
What do you think of his picks?
Participate in the biggest opinion poll ever on our social media handles till 1st May, and let your choices be heard! 🎤… pic.twitter.com/knYdjzNVTg
संजय मांजरेकरांनी जाहीर केलाला 15 जणांचा भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादवं, हर्षित राणा
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा