Syed Mushtaq Ali Trophy: सरफराज खानसह मुंबईच्या 'या' 4 खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग
Syed Mushtaq Ali Trophy: कोरोना महामारीच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाचा राजकीय, क्रिडा, मनोरंजनांसह अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.
कोरोना महामारीच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाचा राजकीय, क्रिडा, मनोरंजनांसह अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. याचदरम्यान, क्रिडा क्षेत्रातून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी माहिती समोर आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात (Mumbai Team) समाविष्ट करण्यात आलेल्या 4 खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या संक्रमित खेळाडूंमध्ये शम्स मुलाणी, साईराज पाटील, प्रशांत सोळंकी आणि सरफराज खान यांचा समावेश आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या चौघांच्या जागी नवीन खेळाडूंची निवड केली. त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, अशीही माहिती मिळाली आहे. आम्ही त्वरीत चार नव्या खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी केली. त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांची संघात निवड केली जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शम्स मुलाणी, साईराज पाटील, प्रशांत सोळंकी आणि सरफराज खान यांना घरी पाठवण्यात आले. तसेच त्यांना पुढील सात दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचे सांगण्यात आले आहे. भारताचा खेळाडू अजिंक्य राहाणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघा गुवाहाटीला जात होता. याआधीच या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबईला ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आले आणि त्यांचे साखळी सामने गुवाहाटीमध्ये होतील. त्यांचा पहिला सामना कर्नाटकशी होणार आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करेल, तर 2020-21 मध्ये मुंबईला विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा पृथ्वी शॉकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तामोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, अमन खान, अरमान जाफर, तनेश जाफर, तनेश कुमार. कोटियन, दीपक शेट्टी आणि रॉयस्तान डायस.
संबंधित बातम्या-