Suryakumar Yadav : हा विजय शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित, पाकची धूळदाण उडवल्यानंतर सूर्यकुमार यादवने मनं जिंकली, पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली
Suryakumar Yadav tribute to victims Pahalgam attack : सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या वाढदिवशी पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाला आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत जवळजवळ प्रवेश मिळवून दिला. 14 सप्टेंबर हा सूर्यकुमारचा वाढदिवस असून, त्याने या विशेष दिवशी कर्णधार म्हणून जबाबदारीची खेळी साकारत संघाला विजयाकडे नेले. या सामन्याला भारतात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात रोष निर्माण झाला होता. त्यामुळे बीसीसीआय, सरकार तसेच भारतीय खेळाडूंवरही तीव्र टीका होत होती. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि संपूर्ण देशाला एकजुटीचा संदेश दिला.
सूर्यकुमार यादवने वाहिली पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली -
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो.
This victory is for you, India 🇮🇳
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025
Watch #DPWorldAsiaCup2025, Sept 9-28, LIVE on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #INDvPAK pic.twitter.com/KXXzoF9fIR
पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही न करून शिकवला धडा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा सामना सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे संपला. टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियासमोर पाकिस्तान एक नवोदित संघ असल्याचे सिद्ध झाले. दोन्ही देशांमधील तणाव आणि निषेधाच्या आवाजात हा सामना दुबईमध्ये खेळला गेला आणि भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्येक आघाड्यावर अपमानित केले. भारताने पाकिस्तानी संघाला वाईटरित्या पराभूत केले, परंतु त्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही न करून त्यांना धडा शिकवला, तर पाकिस्तानी संघ वाट पाहत राहिला.
CAKEWALK 👏#TeamIndia cruise past Pakistan, chasing 127 inside 16 overs 🤩
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025
Watch #DPWorldAsiaCup2025, from Sept 9-28 on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #INDvPAK pic.twitter.com/EncO07RSlD
हे ही वाचा -





















