Ind vs Sl T20 : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव संघाबाहेर झाला आहे. हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे तो या मालिकेतील तिन्ही सामने खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विंडीज संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. याआधी मंगळवारी दीपक चहरही श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दीपक चहर संघाबाहेर होता. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी 5 ते 6 आठवडे लागतील. त्याला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यालाही मुकावे लागू शकते.


विराट कोहली आणि ऋषभ पंतही संघाबाहेर 


अलीकडे भारतीय संघातील जखमी खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असून टीम इंडियातून बाहेर पडले आहेत. आता सूर्यकुमार आणि दीपक चहर देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहली आणि ऋषभ पंत हे देखील श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने सुट्टी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहेत.


रिप्लेसमेंटच्या आशाही कमीच 


येत्या चार दिवसांत भारत-श्रीलंका टी-20 मालिका सुरू होईल आणि समाप्तही होईल. अशा परिस्थितीत चहर आणि सूर्यकुमार यांच्या रिप्लेसमेंटची घोषणा होण्याची फारशी आशा नाही. कारण रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील होणार्‍या नवीन खेळाडूला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रोटोकॉल अंतर्गत आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत मालिका संपेल.


हे ही वाचा -