ICC T20 Rankings :  भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. हा तोच भारतीय संघ आहे, जो चार महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकाच्या लीग स्पर्धेतून बाहेर पडला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. या मालिकेनंतर लगेचच भारत श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग 9 वा विजय मिळवला आहे. याआधी भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा, एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा आणि आता टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव केला. या विजयासह


भारतीय टीम T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही अव्वल स्थानी 


रोहित शर्माच्‍या नेतृत्‍वाखाली भारताचा हा 25 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात भारताला 21वा विजय मिळाला. त्याच्या यशाचे प्रमाण सुमारे 84 टक्के आहे. त्याचवेळी, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 9 वा टी-20 विजय मिळवला आहे. या बाबतीत तो पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदच्या बरोबरीने पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा अश्गर अफगाण 12 विजयांसह आघाडीवर आहे. टी-20 मालिकेत, वेस्ट इंडिजसमोर भारताचा हा सलग चौथा विजय आहे. उभय संघांमधील ही 7वी T20 मालिका होती, ज्यापैकी भारताने पाच वेळा आणि कॅरेबियन संघाने दोन मालिका जिंकल्या आहेत. 2017 मध्ये यूएसएमध्ये झालेल्या टी-20 मालिकेत भारताला वेस्ट इंडिजकडून पराभूत करण्यात आले होते. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारत ICC T20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी 3 मे 2016 ला हा संघ टी-20 क्रमवारीत नंबर वन बनला होता. त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. धोनीनंतर विराट कोहली संघाचा कर्णधार झाला, पण तो त्याच्या नेतृत्वाखाली संघ नंबर-1 बनवू शकला नाही.







भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग 9वा सामना जिंकला. यासह भारताने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. पाकिस्तान संघाने 2018 मध्ये सलग नऊ टी-20 सामने जिंकले होते. T20 इंटरनॅशनलमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे, त्यांनी सलग 12 सामने जिंकले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही पाकिस्तानने सलग 9 सामने जिंकले आहेत. 2018 मध्ये संघाने ही कामगिरी केली. आता भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानला पराभूत करण्याची संधी असेल. ही मालिका 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याआधीही भारताने 2020 मध्ये सलग 9 सामने जिंकले होते, परंतु दोन विजय सुपर ओव्हरमध्ये आले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या नावावर आहे. अफगाणिस्तानने 2018 ते 2019 दरम्यान सलग 12 सामने जिंकले. यादरम्यान संघाने झिम्बाब्वे, बांगलादेश आणि आयर्लंडचा पराभव केला. त्याच वेळी, रोमानियाने 2020 ते 2021 दरम्यान सलग 12 सामने जिंकले. रोमानियाने सलग 12 सामने जिंकल्यानंतर एकही सामना खेळलेला नाही.


हेही वाचा>


Gujarat Titans Logo: गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात


Wriddhiman Saha: वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha