Gujarat Titans Logo: आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सनं आपल्या संघाचा ऑफिशिअल लोगो रिलीज केलाय.  गुजरात टायटन्सच्या लोगोबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता होती. गुजरात टाइटन्सच्या लोगो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. फ्रँचायझीनं आपल्या सोशल अकांऊटवरून एक विशेष व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. 


भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपील लीगच्या पंधराव्या हंगामात दोन नवे संघ सामील झाले आहेत. ज्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. गुजरात टायटन्सनं  त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत त्यांनी आपल्या संघाचा लोगो रिलीज केलाय. या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव केला जातोय.


गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांना ड्राफ्ट केलं. फ्रेंचायझीनं हार्दिक आणि रशीदला 15-15 कोटी आणि शुभमनला 8 कोटींमध्ये संघात समाविष्ट केलं. तर, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरातनं उत्कृष्ट खेळाडूंना खरेदी केलंय. ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचाही समावेश आहे. गुजरातनं 6.25 कोटी मोहम्मद शामीला विकत घेतलंय.


असा आहे गुजरातचा संघ-
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha