एक्स्प्लोर

Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO

Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आले होते.

Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video T20 World Cup 2026: भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये (T20 World Cup 2026) पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. मात्र या मोठ्या विजयानंतर मैदानावर एक घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आले होते. या दरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच नेमकं काय घडलं?, यादरम्यानचा व्हिडीओ स्वत: सूर्यकुमार यादवने शेअर केला आहे. (Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video)

नेमकं प्रकरण काय? (Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video)

दुसऱ्या डावातील 18व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत होता. यावेळी पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेजवळ गेला, जिथे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) उभा होता. झेल तुलनेने सोपा वाटत असताना तो त्याच्या हातातून सुटला आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला. या चुकीनंतर हार्दिक स्पष्टपणे नाराज दिसला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील या प्रसंगावर खुश नव्हता. दोघांनीही काही शब्द कुलदीपला सुनावल्याचे दिसून आले. त्या क्षणापासून वातावरण थोडे ताणले गेलेले जाणवत होते.पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केले. मात्र कुलदीप यादव काहीसा नाराज दिसत होता. त्याने सूर्यकुमार यादवला मिठी मारली खरी, पण चेहऱ्यावर निराशा स्पष्ट होती. त्यानंतर कुलदीप यादव सूर्यकुमार यादवकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. याचवेळी सूर्यकुमार काहीतरी रागाने बोलताना दिसला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 

हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO

सदर प्रकरणानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात कोणताही वाद नाही, हे स्पष्ट झाले आहे. या व्हिडीओमध्ये, हॉटेलच्या परिसरात सूर्यकुमार यादवने कुलदीप यादवसोबत मैदानावरील क्षण पुन्हा तयार करतात. त्यात, कुलदीप यादव रागाने सूर्याच्या पाठीवर थाप मारतो आणि पुढे चालत जातो. यानंतर सूर्यकुमार यादव कुलदीपकडे आश्चर्याने पाहत बसतो. या व्हिडीओला तुझा राग सोडून दे भाऊ..., असं कॅप्शनही दिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

भारत पाकिस्तानचा सामना कसा राहिला? (Ind vs Pak T20 World Cup 2026)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.

संबंधित बातमी:

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: भारत विश्वचषक जिंकायला...शोएब अख्तर पाकिस्तानला सुनावले, नको नको ते बोलला!

Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget