एक्स्प्लोर

IND vs AUS: मिचेल स्टार्कचा बाऊन्सर सुर्यकुमारच्या थेट हेल्मेटवर आदळला, पाहा व्हिडिओ

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचं (India vs Australia) कंबरडं मोडलं.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचं (India vs Australia) कंबरडं मोडलं. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा स्टेडियमवर (Gabba) आज खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी विजय केला. भारताच्या विजयात मोहम्मद शामीनं (Mohammed Shami)  महत्वाची भूमिका बजावलीय. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला 11 धावांची गरज असताना मोहम्मद शामीनं अवघ्या चार धावा खर्च करून ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यात एका रनआऊटचा समावेश आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc) बाऊन्सर थेट भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हेल्मेटवर जाऊन आदळला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

भारताच्या डावातील 19 व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील पाचवा चेंडू सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. स्टार्कच्या बाऊन्सरमुळं सुर्यकुमारचं हेल्मटही तुटलं. ज्यानंतर मैदानात शांतता पसरली. सूर्यकुमार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताच्या अनेक विजयात त्यानं महत्वाची भूमिका बजावली आहे. टी-20 विश्वचषकातही सूर्यकुमारच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. यामुळं सूर्यकुमारला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, अशी भारतीय संघासह संपूर्ण भारतीय चाहत्यांची इच्छा असेल.

व्हिडिओ-

 

सूर्यकुमारचं अर्धशतक
ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या सराव सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमारचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं 151 च्या स्ट्राईक रेटनं 33 चेंडूत 50 धावांची खेळी केली. ज्यात एक षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय
टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झालीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्याकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget