सूर्याचा शतकाचा चौकार, आफ्रिकेची गोलंदाजांची फोडली, धावांचा पाडला पाऊस
Suryakumar Yadav T20i century : टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याने निर्णायक सामन्यात शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूत शतकी नजराना पेश केला.
Suryakumar Yadav T20i century : टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याने निर्णायक सामन्यात शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूत शतकी नजराना पेश केला. सूर्याच्या शतकी खेळीपुढे आफ्रिकेच्या (IND vs SA T20I Series) गोलंदाजांनी गुडघे टेकले होते. सूर्यकुमार यादव याचे टी 20 क्रिकेटमधील हे चौथे शतक होय. लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे सूर्यकुमार यादव याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव याने पहिल्या 25 चेंडूत फक्त 27 धावा केल्या होत्या. पण जम बसल्यानंतर सूर्यकुमार यादवने रौद्ररुप धारण केले. सूर्यकुमार यादव याने पुढील 31 चेंडूत 73 धावांचा पाऊस पाडला. सूर्याच्या फटकेबाजीपुढे आफ्रिकेची बलाढ्य गोलंदाजी दुबळी जाणवत होती.
सूर्यकुमार यादवचा शतकांचा चौकार -
आफ्रिकेविरोधात शतक ठोकत सूर्यकुमार यादव याने टी 20 क्रिकेटमधील चौथे शतक ठोकले. सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजात सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. सूर्यकुमार यादव याने फक्त 57 टी 20 डावात चार शतके ठोकली आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांनीही प्रत्येकी चार शतके ठोकली आहेत. ग्लेन मॅक्सवेल याने 92 डावात चार शतके ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 140 डावात चार शतके ठोकली आहेत. सूर्यकुमार यादव याने भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर शतके ठोकली आहेत.
सूर्याचा शतकी तडाखा -
दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 8 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने टी 20 क्रिकेटमधील दुसरे शतक ठोकले. सूर्याने यशस्वी जायस्वाल याच्यासोबत शतकी भागिदारी केली. त्यानंतर रिंकूसोबत 47 धावांची भागिदरी केली. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर यशस्वी जायस्वाल आणि सूर्याने मोर्चा संभाळला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेची गोलंदाजी फोडली. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या आणि यशस्वी यांनी 70 चेंडूत 112 धावांची भागिदारी केली. सूर्याने चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 200 पार नेली.
विराटचा विक्रम मोडला -
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने टी 20 मध्ये विराट कोहलीला मागे टाकत भारतासाठी मोठा विक्रम केलाय. सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला मागे टाकले आहे. या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. टीम इंडियासाठी रोहित शर्माने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. आत्तापर्यंत सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 123 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नावावर 117 षटकार आहेत. रोहित शर्माने 182 षटकार ठोकले आहेत.