Steve Smith : स्टीव्ह स्मिथ बाद, पण कसोटीच्या 148 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडलं; मैदानात नेमकं काय झालं?
ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळले.
AUS vs IND 5th Test : ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळले. त्यामुळे यजमान संघाला 162 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 61 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 6 तर कर्णधार पॅट कमिन्सने 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने धमाकेदार सुरुवात केली. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा या सलामीच्या जोडीने पहिल्याच षटकात 13 धावा केल्या. एवढेच नाही तर पहिली विकेट पडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 4 षटकांत 39 धावा करण्याचा मोठा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का सॅम कॉन्स्टासच्या रूपाने बसला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला 22 धावांवर आऊट केले. यानंतर क्रीजवर आलेला मार्नस लॅबुशेनही कृष्णाने बाहेरचा रस्ता दाखवला. लॅबुशेन केवळ 2 धावांचे योगदान देऊ शकला. ऑस्ट्रेलियन संघाला 8 षटकात 56 धावांवर दोन मोठे धक्के बसले होते. यानंतर स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आला. ऑस्ट्रेलियन चाहत्यांना स्मिथकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण पुन्हा एकदा त्याने चाहत्यांना निराश केले आणि त्याने केवळ 4 धावा केल्या आणि अशा प्रकारे तो कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्यापासून फक्त एक धाव दूर राहिला.
Steve Smith gets caught just one run away from joining the 10,000 runs club 💔 #AUSvIND pic.twitter.com/ceKcfliOIO
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2025
सिडनी कसोटीपूर्वी स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 38 धावांची गरज होती. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथ 10,000 धावांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा होती, पण तो 33 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे 10 हजार धावा पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न फक्त 5 धावा दूर राहिले. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात स्मिथ 10 हजारांच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण करेल असे सर्वांना वाटत होते.
पण प्रसिद्ध कृष्णाने हे होऊ दिले नाही आणि तो केवळ 4 धावांवर आऊट झाला. अशाप्रकारे, कसोटी कारकिर्दीत 9999 धावांवर बाद होणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. याआधी, कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात असे एकदाच घडले होते. श्रीलंकेचा महेला जयवर्धने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9999 धावांवर धावबाद झाला होता.
कसोटी कारकिर्दीत 9999 धावांवर बाद झालेले फलंदाज
- महेला जयवर्धने विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2011 सुपरस्पोर्ट पार्क
- स्टीव्ह स्मिथ विरुद्ध भारत, 2025 सिडनी क्रिकेट ग्राउंड
हे ही वाचा -