Praveen Jayawickrama Tests COVID-19 Positive: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 8 जुलैपासून दुसऱ्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा युवा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.चार दिवसांत श्रीलंकेचे दोन खेळाडूंना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जयविक्रमा सध्या आयसोलेशनमध्ये असून तो गॅले येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडलाय.


श्रीलंका क्रिकेटनं एका निवेदनात म्हटले आहे की, जयविक्रमाला अस्वस्थ वाटत असल्यानं त्याची आज सकाळी रॅपिट अँटीजेन टेस्ट करण्यात आली. ज्यात त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला ताबडतोब संघातील उर्वरित सदस्यांपासून वेगळं करण्यात आलं. तो पुढील पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे.  जयविक्रमाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर श्रीलंकेच्या उर्वरित संघाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यांचे सर्वांचे निकाल निगेटिव्ह आले आहेत.


ट्वीट-



अँजेलो मॅथ्यूजही कोरोनाबाधित
यापूर्वी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची शुक्रवारी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्य संघाला 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेच्या संघाचा मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असेल.


क्रिकेटविश्वात वेगानं कोरोनाचं जाळं पसरताना दिसत आहे. यापूर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माही कोरोनाच्या जाळ्यात अडकला होता. मात्र, काही दिवसांत रोहित शर्मानं कोरोनावर मात करत पुन्हा मैदानात परतला आहे.


हे देखील वाचा-