ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 132 धावांची आघाडी मिळवणारा भारतीय संघ बॅकफूटवर गेलाय. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांच्या जोरावर पुनरागमन केलंय. पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटी सामन्याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी भाष्य केलंय. बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताच्या 'भय' आणि 'बचावात्मक' दृष्टिकोनामुळं इंग्लंडला पुनरागमनाची संधी मिळाली, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.


रवि शास्त्री काय म्हणाले?
एजबॅस्टन येथे स्काय स्पोर्ट्सशी बोलताना रवि शास्त्री म्हणाले की,  "बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. भारतीय सघाला दोन सत्र फलंदाजी करण्याची गरज होती. परंतु, लंच ब्रेकनंतर भारतीय खेळाडूं बचवात्मक भूमिका स्वीकारत खेळाला सुरुवात केली. विकेट गमावूनही भारतीय संघाला धोका पत्करता आला असता. त्यावेळी भारतीय संघाला धावांची खूप गरज होती. मला वाटते की ते खूप बचावात्मक झाले आणि पाठोपाठ विकेट्स गमावल्या. ज्यामुळं इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळाला." 


इग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर
भारतीय संघानं गेल्यावर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा केला होता. या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी मिळवली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला. हाच कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाकडं इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. मात्र, या निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर असून इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.


हे देखील वाचा-