ENG vs IND: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि मधल्या फळीची फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा उस्मान ख्वाजा (Usman Khawaja), बांगलादेशचा लिटन दास (Liton Das) आणि न्यूझीलंड डॅरिल मिशेल (DJ Mitchell) यांच्या नावाचा सामावेश आहे. 


जॉनी बेअरस्टो
इंग्लंडच्या संघाचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलं आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत जॉनी बेअरस्टो अव्वल स्थानी आहे. त्यानं यावर्षी आठ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 73.23 च्या सरासरीनं आणि 76.40 च्या स्ट्राईक रेटनं 952 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतक आणि दोन अर्धशकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा सर्वोत्तम धावासंख्या 162 इतकी आहे.


जो रूट 
या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी त्यानं आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यात 57.40 च्या सरासरीनं 861 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.


उस्मान ख्वाजा
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजानं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या वर्षभरात त्यानं आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 117.42 च्या सरासरीनं 822 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं चार शतक आणि तीन अर्धशतक ठोकली आहेत.


लिटन दास
बांगलादेशी क्रिकेटपटू लिटन दाससाठी यंदाचं वर्ष चांगलं ठरलंय. यावर्षी खेळण्यात आलेल्या 8 कसोटी सामन्यात त्यानं 47.07 सरासरीनं 659 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 141 इतकी आहेत.


डॅरिल मिशेल
कसोटी क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत डॅरिल मिशेल पाचव्या क्रमांकावर आहे. यावर्षी त्यानं 6 सामन्यात 71.22 सरासरीनं 641 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्यानं तीन शतक आणि तीन अर्धशतक ठोकली आहेत. 


हे देखील वाचा-