IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पंचांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला. विराट आणि बेअरेस्टो यांच्यातील वाद पहिला नाही. याआधीही भारत- इंग्लंडचे खेळाडूं भरमैदानात एकमेकांशी भिडले आहेत. 


1) नासिर हुसेन विरुद्ध सचिन तेंडुलकर
भारत-इंग्लंड यांच्यात 2001 मध्ये बंगळुरू येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर सचिनं तेंडूलकर यांच्यातील वाद पाहायला मिळाला. सचिनं तेंडुलकरला बाद करण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या. या सामन्यात त्यानं इंग्लंडचा फिरकीपटू ऍशले जाइल्सला लेग स्टंपवर गोलंदाजी करायला सांगितलं. ज्यामुळं सचिन तेंडूलकरचा संयम तुटला. या सामन्यात सचिन तेंडुलकर स्टंप आऊट झाला. त्यावेळी नासिर हुसैन यांच्या या रणनीतीवर बरीच टीका झाली होती.


2) जेली बीन्स वाद
भारतीय क्रिकेट संघ 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळायला गेला. त्यावेळी ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यात जाहीर खान फलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा त्याच्या खेळपट्टीभोवती काही जेली बीन्स ठेवल्याचं आढळलं. त्यानंतर जाहीर खाननं स्वत: त्या जेली बीन्स खेळपट्टीवरून हटवल्या. पण काही वेळानंतर जाहीर खानला पुन्हा खेळपट्टीवर जेली बीन्स दिसल्या. त्यानंतर जाहीर खान आणि इंग्लंडचा कर्णधार केव्हीन पीटरसरनशी भिडला. दरम्यान, जाहीर खाननं पीटरसनला बॅट दाखवली होती.


3) इयान बेल रन आऊट
2011 च्या नॉटिंगहॅम कसोटीच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात आहेत. त्या सामन्यात पंचांनी आऊट देऊनही धोनीने इयान बेलला परत बोलावलं होतं. ही संपूर्ण घटना नॉटिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहाच्या वेळेच्या एक चेंडू आधी घडली. त्यावेळी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इयान बेल 137 धावांवर खेळत होता. इशांत शर्माच्या चेंडूला इऑन मॉर्गननं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळला. इयान बेलला चेंडू सीमारेषेला लागल्याचं जाणवलं आणि तीन धावा पूर्ण न करता तो मॉर्गनकडं आला आणि 'टी टाईम' असे गृहीत धरून पॅव्हेलियनकडे जाऊ लागला. परंतु, चेंडू सीमारेषेला लागला नसल्यानं त्याला रन आऊट करण्यात आलं होतं. 


4) जेम्स अँडरसन आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील जोरदार वाद
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा यांच्यात 2014 साली नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात जोरदार वाद झाला होता. नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी रविंद्र जाडेजा आणि अँडरसन यांच्यात बाचाबाची झाली.डरसनने जडेजाला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये येऊन दात तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.


 5) बेन स्टोक्स आणि विराट कोहली
इंग्लंडचा संघ 2016 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी मोहाली कसोटी सामन्यात विराट कोहली आणि बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले होते. मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टोक्स आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना कोहलीशी भिडला होता. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेला असताना बेन स्टोक्सनं विराट कोहलीची विकेट घेतली होती. कोहली बाद झाल्यावर स्टोक्सने तोंडावर बोट ठेवून त्याला डवचलं. या कसोटी सामन्यानंतर स्टोक्सलाही आयसीसीनं फटकारलं आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला.


हे देखील वाचा-