एक्स्प्लोर

Danushka Gunathilaka : क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकावर बलात्काराचा आरोप, सर्व क्रिकेट फॉर्मेटमधून निलंबित, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा निर्णय

Danushka Gunathilaka News : श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलाका याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये बलात्काराचा आरोप लावण्यात आला असून त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारवाई केली आहे.

Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News  : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळता येणार नाहीत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक निवेदन समोर आणलं आहे. त्यात म्हटले आहे की, "दानुष्का गुणथिलाका याने ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर आणि तिच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे.'' या निवेदनात या आरोपाची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षाही केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाला अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडनी पोलिसांनी श्रीलंका टीम थांबलेल्या हॉटेलमधून दानुष्काला अटक केली होती. सध्या दानुष्का सिडनीत असून श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला परतला आहे. दरम्यान न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना 'रोझ बे' या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी 31 वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली, अशीही माहिती समोर आली आहे.

दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकपमधून बाहेर

टी-20 विश्वचषक स्पर्धेत दानुष्का गुणथिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेव सामना खेळला. त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याजागी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे  स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. 

दानुष्का गुणथिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणथिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दानुष्का गुणथिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Embed widget