SRH VS PBKS सामन्यात तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू भिडले, ट्रायव्हेस हेड अन् ग्लेन मॅक्सवेलमध्ये भर मैदानात वाद; मार्कस स्टॉयनिसही आला...
SRH VS PBKS : पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला.

SRH vs PBKS 2025 : आयपीएलमध्ये शनिवारी (दि.13) सनरायझर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्जचा संघ आमने सामने आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्ज 245 धावांचा डोंगर उभारला आणि हैद्राबाद समोर 246 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दरम्यान, पंजाब किंग्जचे आव्हान सनरायजर्स हैद्राबादने 9 चेंडू शिल्लक ठेऊन गाठलंय. अभिषेक शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर हैद्राबादने हा दिमाखदार विजय मिळवलाय. अभिषेक शर्मा 141 तर ट्रेविस हेड 66 धावांची दमदार खेळी करत हैद्राबादला विजय मिळवून दिला. दरम्यान, हैद्राबादचे सलामीवर फलंदाजी करत असताना ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेलचा वाद झालेला पाहायला मिळाला. दरम्यान, त्यानंतर मार्कस स्टॉयनिसनेही या वादात उडी घेतलेली पाहायला मिळाली.
Fight between Travis Head, Maxwell & Stoinis in IPL.
— Hindutva Knight (@KinghtHindutva) April 12, 2025
IPL on peak
#SRHvsPBKS pic.twitter.com/LaiRMAExIC
सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या 9 व्या षटकात ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात जोरदार वाद झाला. शेवटचा चेंडू डॉट गेल्यानंतर हेडने रागात मॅक्सवेलला काहीतरी बोलायला सुरुवात केली. मॅक्सवेलची प्रतिक्रियाही अशीच काही होती. त्यामुळे हेडला इतका राग का येत आहे हे त्याला समजत नव्हते. पंचही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले, परंतु हेड सतत काहीतरी बोलत राहिला. तो मॅक्सवेलकडे रागने पाहात काहीतरी बोलत राहिला. त्यानंतर पंजाब किंग्जचा भाग असलेला मार्कस स्टॉयनिस आला आणि थेट हेडच्या डोळ्यात पाहत काहीतरी बोलू लागला. स्टॉयनिस थोडा हसला आणि मग दोघे वेगळे झाले. पण हा वाद या डॉट बॉलमुळे नव्हता, तर तो आधीच सुरू झाला होता.
Fight between Travis Head, Maxwell & Stoinis in IPL.
— Hindutva Knight (@KinghtHindutva) April 12, 2025
IPL on peak
#SRHvsPBKS pic.twitter.com/LaiRMAExIC
मॅक्सवेलने टाकलेल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. याआधी हेडने मॅक्सवेलच्या सलग दोन चेंडूंवर षटकार मारले होते. मॅक्सवेलने हेडसमोर टाकलेला पाचवा चेंडू डॉट गेला. चेंडू मॅक्सवेलकडे गेला आणि त्याने तो यष्टीरक्षकाकडे फेकला. हेडला वाटले की चेंडू त्याच्या जवळून गेला आहे आणि तो रागाने मॅक्सवेलला काहीतरी म्हणाला.
ट्रॅव्हिस हेडने 37 चेंडूत 66 धावांची दिमाखदार खेळी केली, या खेळीत त्याने 3 षटकार आणि 9 चौकार लगावले. हेडने अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादने 8 विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















