IPL Trade News 2026 : आयपीएलमधील सर्वात खतरनाक एक्सचेंज, मुंबईचा राजा रोहित शर्मा हैदराबादमध्ये जाणार अन् ट्रॅव्हिस हेड येणार?
आयपीएल 2026च्या तयारीदरम्यान मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील मोठ्या ट्रेडच्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

IPL 2026 Trade Window Update News : आयपीएल 2026च्या तयारीदरम्यान मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील मोठ्या ट्रेडच्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, एसआरएचने ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी ऑफर दिली असून, त्याबदल्यात त्यांनी आपला स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड मुंबईकडे पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या चर्चांबाबत अद्याप दोन्ही संघांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
आयपीएल 2026 आधी ट्रेडच्या चर्चांना ऊत
या महिन्याच्या अखेरीस सर्व संघांना आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. त्याआधीच ट्रेडच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याचाही चेन्नई सुपर किंग्जकडे (CSK) ट्रेड होण्याची चर्चा आहे. समजते की, राजस्थानने त्याबदल्यात रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराना यांची मागणी केली आहे.
दरम्यान, इंडियन क्रिकेटनावाच्या एका अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, SRH ने ट्रॅव्हिस हेडच्या बदल्यात रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला आहे. हे ट्विट काही तासांतच 4.9 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले. या चर्चेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मीम्स, अंदाज आणि प्रतिक्रिया यांचा अक्षरशः पूर आणला.
Doesn't look likely but if it were to happen it would be sort of homecoming for Rohit . He will end his IPL career with a Hyderabad based franchise after starting with them two decades earlier
— Parag Mandpe (@ParagMandpe) November 9, 2025
Also what an explosive opening combo it would be seeing both the Sharma's on either end…
मुंबई इंडियन्सने अद्याप या ट्रेडबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी रोहित शर्माचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “सूर्य पुन्हा उगवेल हे नक्की, पण ‘नाईट’मध्ये... ते अशक्यच आहे.” या पोस्टमध्ये ‘Night’ या शब्दातील ‘K’ हायलाइट करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांनी हे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबत जोडले. त्याच वेळी Sun Will Rise असा उल्लेखही करण्यात आला होता, ज्यामुळे काहींनी हे सनरायझर्स हैदराबाद (SRH) शी संबंधित असल्याचे म्हटले. यामुळे चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले, हा संघाचा कणा आहे. दुसरीकडे, ट्रॅव्हिस हेड हा विस्फोटक फलंदाज आहे. 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताविरुद्ध त्याने खेळलेली शानदार खेळी अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. तो गेल्या काही हंगामांत सातत्याने उत्कृष्ट खेळ करत आला आहे. त्यामुळे मुंबईसाठी तो पॉवरप्लेमध्ये आक्रमक पर्याय ठरू शकतो.
हैदराबादचा हा संभाव्य प्रयत्न त्यांच्या संघात अनुभवी आणि स्थिर ओपनर आणण्याच्या इच्छेकडे इशारा करतो. ट्रॅव्हिस हेड जरी आक्रमक फलंदाज असला तरी रोहित शर्मासारखा अनुभवी कर्णधार आणि विश्वासार्ह सलामीवीर कोणत्याही संघासाठी अमूल्य ठरतो. जर हा ट्रेड खरा ठरला, तर ती आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि डील ठरेल.
हे ही वाचा -





















