Women's World Cup : : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) या स्पर्धेला (4 मार्च) पासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी 6.30 वाजता विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली.  याच पार्श्वभूमीवर Google ने सुद्धा आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या शुभारंभानिमित्त खास Doodle साकारून महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचे गुगूल डूडल (Google Doodle) हे महिला क्रिकेटला समर्पित आहे.  


आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी!


आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात (ICC Womens Cricket World Cup 2022) होत आहे. या निमित्त Google Doodle मध्ये 6 महिला खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. या खेळाडूंच्या खेळाचा आनंद प्रेक्षक घेत असल्याचेही डूडलमध्ये पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज होत आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.  न्यूझीलंडसमोर वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे.  यंदाच्या विश्वचषकात आठ संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार, चार संघांमध्ये सेमी फायनल्सचे सामने रंगतील. त्यानंतर तीन एप्रिलला फायनल खेळवण्यात येईल. या विश्वचषकाचे सर्व सामने न्यूझीलंडमधील सहा शहरांमध्ये खेळवण्यात येतील. 




महिला विश्वचषकासाठी भारतीय संघ -
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, राजेशवासी. आणि पूनम यादव.


भारतीय महिला क्रिकेट संघाचं वेळापत्रक



  • भारत विरुद्द पाकिस्तान - 6 मार्च 2022 

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- 10 मार्च 2022

  •  भारत विरुद्ध वेस्ट इंडीज- 12 मार्च 2022

  • भारत विरुद्ध इंग्लंड- 16 मार्च 2022

  • भारत विरुद्ध ऑकलँड- 19 मार्च 2022

  • भारत विरुद्ध बांगलादेश- 22 मार्च 2022

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- 27 मार्च 2022


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :