IND vs SL Test : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे. तर रोहित शर्मासाठीही हा सामना फार महत्त्वाचा मानला जात आहे.


श्रीलंकेचा संघ पाच वर्षानंतर भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. शेवटच्या वेळी 2017 मध्ये श्रीलंकेने भारतीय भूमीवर तीन कसोटी सामन्यांची मालिका 0-1 ने गमावली होती. क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेच्या संघाने भारतीय भूमीवर एकही कसोटी जिंकलेली नाही. त्याने आतापर्यंत 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामने तो पराभूत झाला आहे, तर 9 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.


मोहालीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी खूप खास असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा हा सामना कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. दुसरीकडे, रोहित शर्मा हा सामना जिंकून भारताचा 35 वा कसोटी कर्णधार म्हणून धमाकेदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. या कसोटी सामन्याने रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचाही नवा प्रवास सुरू होईल. 


सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर लागल्या आहेत. विराटचा 100वा कसोटी सामना सध्या चर्चेचा विषय आहे. या 100व्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याचा अंदाज बांधला जात आहे. कोहलीला सुरंगा लखमल, लाहिरू कुमारा किंवा लसिथ एम्बुल्डेनियासारख्या गोलंदाजांसह श्रीलंकेच्या आक्रमणाचा सामना करण्यास काही त्रास होईल असे वाटत नाही. कोहलीला त्याच्या कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक्स आणि पुल्सने त्याच्या चाहत्यांना मोहित करायला नक्कीच आवडेल.



संबंधित बातम्या: 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha