ICC Women's World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात (India Women vs South Africa Women) फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मांधनाच्या (Smriti Mandhana) डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळं तिला ‘रिटायर्ड हर्ट‘ होऊन पव्हेलियनमध्ये परतावं लागलं होतं. मात्र, आता तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीनं (BCCI) दिलीय.
आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला बाऊन्सर स्मृतीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी तिला फलंदाजी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिला त्रास जाणवत असल्यानं तिनं मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिला खबरदारी म्हणून उर्वरित सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेऊन आहे. तसेच पुढील सामन्यात स्मृती मांधना खेळणार की नाही? याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारत पाकिस्तानशी भिडणार
विश्वषकातील पहिल्या सामन्यात भारताचा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. यातच स्मृती मांधनाचं अनफीट असणं भारतासाठी मोठा धक्का असू शकतो. स्मृती मांधनाचा हा दुसरा महिला विश्वचषक असेल. या विश्वचषकात ती महत्वाची भूमिका बजावेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
स्मृती मांधनाची एकदिवसीय कारकीर्द
स्मृती मांधना ही आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील फलंदाज आहे. तिने 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.71 च्या सरासरीने 2461 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : गुजरात टायटन्सला झटका, जेसन रॉयची माघार
- AUS vs PAK : पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतो...
- रशियाला फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं; युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे FIFA ची कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha