India Tour of South Africa 2021: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उद्या (रविवारी, 5 डिसेंबर) भारतीय क्रिकेट संघाची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समिती भारतीय संघाची निवड करण्यात येईल. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. एकदिवसीय संघाचं कर्णधारपद कोहलीकडंच कायम राहणार की अन्य दुसऱ्या खेळाडूला भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार? हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. यामुळं भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असताना बीसीसीआयचं सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच ओमायक्रॉन प्रकारामुळं दक्षिण अफ्रिकेत दररोज कित्येक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत? या सर्व गोष्टींवर बीसीसीआय रोज लक्ष ठेवून आहे. महत्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचे चिन्ह निर्माण झाले. परंतु, ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आळढलेल्या जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. 


या दौऱ्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र, बीबीसीसीआयनं टी-20 मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. भारतानं नुकताच इंग्लंडचा दौरा केलाय. त्यानंतर भारतीय कॅम्पमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर मँचेस्टरमधील पाचवा कसोटी सामना पुढे ढकलावा लागला होता. हा कसोटी सामना 2022 मध्ये खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-