South Africa vs Afghanistan, Semi Final 1:  टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सेमी फायनलचा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (SA vs AFG) यांच्यात सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ गारद झाला. अफगाणिस्तानने 10 विकेट्स गमावत 56 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी 57 धावांची गरज असणार आहे.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 11.5 षटकात 56 धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अजिबात योग्य ठरला नाही. आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना विकेट्सवर टिकू दिले नाही. सुरुवातीपासूनच आफ्रिकन गोलंदाजांनी विकेट घेण्याची मालिका सुरू ठेवली.






उपांत्य फेरीसाठी अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन


रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.


उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन


क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.


टी20 विश्वचषक 2024 मध्ये दोन्ही संघाची कामगिरी - 


अफगानिस्तान : साखळी फेरीत अफगानिस्तानने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला.  ग्रुप स्टेजमध्ये फक्त वेस्ट इंडिजकडून त्यांचा पराभव झाला. सुपर 8 मध्ये फक्त भारताविरोधात अफगाण संघाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्याविरोधात विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. 


दक्षिण अफ्रीका : साखळी फेरीत दक्षिण अफ्रीकाने सर्व सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी नेदर्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर सुपर 8 मध्येही आफ्रिका संघ अजेय राहिला. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना अफगाणिस्तानविरोधात होत आहे.  


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत


T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?