IND vs SA: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour of India 2022) येणार आहे. भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी देखील दक्षिण आफ्रिकेचा हाच संघ खेळेल, जो टी-20 विश्वचषकासाठी निवडला गेलाय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 28 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. टेम्बा बावुमाच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. अनुभवी खेळाडू क्विंटन डी कॉकला संघात स्थान मिळालं आहे. एडिन मार्कराम आणि केशव महाराज हे देखील संघात आहेत. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 2 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला खेळला जाईल. यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल, जी 11 ऑक्टोबरपर्यंत खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण  वेळ
पहिला टी-20 सामना 28/09/2022 ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम संध्याकाळी 7.30 वा
दुसरा टी-20 सामना 02/10/2022 बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी संध्याकाळी 7.30 वा
तिसरा टी-20 सामना 04/10/2022 होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर संध्याकाळी 7.30 वा

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण  वेळ
पहिला एकदिवसीय सामना 06/10/2022 एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ दुपारी 1.30 वा
दुसरा एकदिवसीय सामना 09/10/2022 जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची दुपारी 1.30 वा
तिसरा एकदिवसीय सामना 11/10/2022 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली दुपारी 1.30 वा

दक्षिण आफ्रिका संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोसॉव, तबरेज शम्सी.

हे देखील वाचा-