BCCI New Title Sponsor : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत (MasterCard)  शीर्षक प्रायोजकत्वासाठी ( Title Sponsor) करार केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ( महिला आणि पुरूष) (International Matches)  सामन्यांसाठी मास्टरकार्ड भारतीय संघाचे शीर्षक प्रायोजक असणार आहे. 


मास्टरकार्ड हे घरच्या मैदानावर आयोजित सर्व  सामने आणि आंतरराष्ट्रीय सामने (महिला आणि पुरुष दोन्ही), BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील)  शीर्षक प्रायोजक असणार आहे. हे सामने भारतात होणार आहे जगभरातील तसेच देशभरातील क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचण्यासाठी मास्टरकार्ड हा निर्णय घेतला आहे. UEFA चॅम्पियन्स लीग, ग्रॅमी, कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा यांसारख्या जगभरात अनेक स्पर्धांमध्ये भागीदार आहे.   


 बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगली म्हणाले,  आगामी काळात घरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजक म्हणून मास्टरकार्डचे स्वागत करते. आंतरराष्ट्रीय मालिकेबरोबरच BCCI च्या देशांतर्गत स्पर्धा महत्वाच्या आहेत कारण त्या देशाला  एक मजबूत आंतरराष्ट्रीय संघ बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. 


भारताचा माजी कर्णधार धोनीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. धोनी मागील चार वर्षापासून मास्टरकार्डचा ब्रँड अॅम्बेसीडर आहे. धोनी म्हणाला,  क्रिकेट हे माझे जीवन आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते मला क्रिकेटने दिले आहे. मास्टरकार्ड BCCI चे सर्व  देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय  सामने आणि विशेषत: ज्युनियर आणि महिला क्रिकेटचे प्रायोजकत्व करत आहे याचा मला आनंद आहे.


एका सामन्याचे 3.8 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार


जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमने (PayTm) बीसीसीआयकडे (BCCI) टायटल स्पॉन्सरशिप पुढे न वाढवण्याची मागणी केली होती. पेटीएमनेच हे अधिकार मास्टरकार्डला (Mastercard) देण्याबाबतही यावेळी बीसीसीआयला सल्ला दिला. दरम्यान या करारानंतर आता मास्टरकार्डकडून बीसीसीआयला भारताच्या एका सामन्यानंतर जवळपास 3.8 कोटी रुपये मिळणार आहेत.


संबंधित बातम्या :


Sourav Ganguly: सौरव गांगुलींची लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतून माघार; कारण आलं समोर


Asia Cup 2022: आशिया कपचं लाईव्ह ब्रॉडकास्ट 132 देशांमध्ये पाहता येणार? कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग, वाचा सविस्तर