Asia Cup 2022: आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. धोनीचं ट्रेन्डिंगमध्ये येण्यामागचं अनेक कारण आहेत. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंर विराट कोहलीनं (Virat Kohli) पत्रकार परिषदमध्ये धोनीच्या नावाचा उल्लेख केला होता. यासह धोनीची चाहते सोशल मीडियावर त्याचे काही रेकॉर्ड्सही शेअर करत आहेत.
पाकिस्तानविरुद्ध धोनीचं रेकॉर्ड
महेंद्रसिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्यानं कोणत्याही स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला नाही. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानशी एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील भारतानं 6 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये द्विपक्षीय सामना खेळला गेला होता, ज्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. धोनीशिवाय भारतानं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दोन पैकी एका सामन्यात पाकिस्तानचा पराभव केलाय. कोहलीच्या नेतृत्वाखाली फक्त एकच सामना खेळला, ज्यात भारताचा पराभव झाला.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधार-
क्रमांक | भारतीय कर्णधार | सामने | विजय | पराभव | अनिर्णित |
1 | महेंद्रसिंह धोनी | 08 | 06 | 01 | 01 |
2 | रोहित शर्मा | 02 | 01 | 01 | 00 |
3 | विराट कोहली | 01 | 01 | 01 | 00 |
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-