Ganguly Launched Edu App : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने बुधवार एक ट्वीट करत क्रीडा विश्वात खळबळ माजवली होती. गांगुलीच्या ट्वीटनंतर त्याने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण आता यावर स्वत: सौरव गांगुलीने स्पष्टीकरण दिलेय.
सौरव गांगुली यांनी भावूक ट्वीट करत, लवकरच ते नवी इंनिग सुरुवात करणार आहे अशी माहिती दिली. आतापर्यंतच्या प्रवासात सोबत असणाऱ्या चाहत्यांचं आणि खेळाडूंचं सौरव गांगुली यांनी आभार व्यक्त केलेय. तसेच सौरव गांगुली यांनी पुढील वाटचालीसाठी समर्थन मागितलेय. सौरव गांगुली यांच्या ट्वीटनंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर ट्रेंडही सुरु झाला. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एएनआयला सौरव गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती दिली आहे.
शिक्षण क्षेत्रात पदार्पण करणार
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाले की, 'बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मी नवीन एज्युकेशन अॅप लाँच करणार आहे. ' BCCI मधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली शिक्षण क्षेत्रात नवीन कंपनी लाँच करणार आहेत.
ऑक्टोबर 2022 मध्ये सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. त्याआधी सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघाचे चीफ म्हणून काम पाहिलेय.
सौरव गांगुलीने ट्विटमध्ये काय म्हटलेय?
2022 माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण, क्रिकेटमध्ये करिअर सुरु करुन 30 वर्ष पूर्ण झाली. 1992 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. 30 वर्षांच्या प्रवासात क्रिकेट खेळत असताना सर्वांकडूनच सपोर्ट मिळाला. क्रिकेटने मला खूप काही दिले. या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. आता नव्या नवीन इनिंग सुरुवात करणार आहे. यामध्ये सर्वांचा सपोर्ट मिळेल, अशी आपेक्षा आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा अस्वाद घेतला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेक विषयांबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे सौरव गांगुली लवकरच भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सौरव गांगुलीला लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे.