SL vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या (Sri Lanka vs Australia) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं चार धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत 3-1 नं आघाडी घेऊन मालिकेवर कब्जा केलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर (David Warner) 99 धावांवर बाद झाला. एका धावानं शतक हुकल्यानं डेव्हिड वार्नर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात डेव्हिड वार्नर कसा आऊट झाला? हे पाहुयात.
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 50 षटकात ऑस्ट्रेलियासमोर 259 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियाचे फलंदाज माघारी पतरले. दुसऱ्या बाजूनं डेव्हिड वार्नरनं ऑस्ट्रेलियाची बाजू संभाळून ठेवली. परंतु, तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. या सामन्यात डेव्हिड वार्नरचं एका धावानं शतक हुकलं. श्रीलंकेच्या निरोशन डिकवेलानं कोणताही चूक न करता डेव्हिड वार्नरला 99 धावांवर बाद केलं.
व्हिडिओ-
डेव्हिड वार्नच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावा
डेव्हिड वॉर्नरनं या सामन्यात 62 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर 15 हजार 938 धावा होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. ज्याने 559 सामन्यांमध्ये 27 हजार 368 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत स्टीव्ह वॉ (18 हजार 496), अॅलन बॉर्डर (17 हजार 698), मायकेल क्लार्क (17 हजार 112) आणि मार्क वॉ (16 हजार 529) यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा-