नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुष क्रिकेटमधील 6 नियम बदलले आहेत. यामुळं क्रिकेट  अधिक वेगवान, निष्पक्ष आणि रोमांचक  होण्यात मदत होणार आहे. कसोटी क्रिकेटमधील नियम 2025-27 या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून लागू केले जाणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट आणि टी 20 क्रिकेटमधील नियम 2 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलेले आहेत. 

क्रिकेटमधील बदललेले 6 नियम

कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम : आयसीसीनं कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार कसोटी क्रिकेटमध्ये फील्डिंग करणाऱ्या टीमनं 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ ओव्हर सुरु करण्यास लावल्यास पहिल्यांदा दोन वेळा वॉर्निंग दिली जाणार आहे. त्यानंतर नियमाचा भंग केल्यास त्या संघाच्या 5 धावा वजा केल्या जाणार आहेत. टी 20 क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये नियम एक वर्षापूर्वीपासून लागू केलेला आहे. 

शॉर्ट रनवर दंड 

आयसीसीनं कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटमधील शॉर्ट रनचा नियम बदलला आहे. जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेतल्यास पहिल्यांदा 5 धावांचा दंड लावला जायचा. आता फलंदाजानं अतिरिक्त रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक पहिली रन पूर्ण न केल्यास अम्पायर फील्डिंग करणाऱ्या संघाला स्ट्राइकवर कोणता खेळाडू पाहिजे असं विचारतील. 5  धावांचा नियम देखील लागू असेल. 

चुकून सलाइवा लावल्यास बॉल बदलला जाणार नाही 

एखाद्या गोलंदाजानं बॉलवर सलाइवा (लाळ) लावल्यास  बंदी कायम राहील. चुकून सलाइवा लावल्यास बॉल बदलनं अनिवार्य नसेल. बॉलच्या रचनेत बदल झाल्यास किंवा बॉल खूप ओला झाल्यानं त्याच्यावरील चमक वाढल्यास अम्पायर बॉल बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. बॉल बदलण्याचा निर्णय घेणं हे पंचांच्या विवेकावर अवलंबून असेल. बॉलमध्ये फार बदल झाला नसेल तर  तर तो बदलला जाणार नाही. हे नियम कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटसाठी लागू असतील. 

कॅच रिव्यूमध्ये LBW तपसाणार

आयसीसीनं कॅचच्या नियमात देखील बदल केले आहेत. जर कॅच आऊटच्या रिव्यूमध्ये  तो चुकीचा ठरल्यास आणि बॉल पॅडवर लागल्यास टीव्ही अम्पायर एलीबीडब्ल्यू फलंदाज आऊट आहे का ते पाहतील. हा नियम कसोटी, टी 20 आणि वनडे मध्ये लागू असेल. 

नोबॉलवर कॅच  

 पंचांनी सॉफ्ट सिग्नल रिव्यू घेतल्यास आणि नो बॉलवर कॅच योग्य असल्यास फलंदाजी करणाऱ्या टीमला नो बॉलची एक रन अतिरिक्त मिळेल. कॅच योग्य नसल्यास नो बॉलची एक रन आणि फलंदाज जितक्या रन धावतील त्यांना त्या धावा मिळतील.  

पहिल्यांदा कॅचसंदर्भात संशय असल्यास मैदानावरील पंच  थंर्ड अम्पायरकडे दाद मागायचे. त्यावेळी टीव्ही अम्पायर नो बॉल होता की नव्हता हे सांगायचे, कॅचची तपासणी करत नव्हते. आता त्याची तपासणी केली जाईल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये हा नियम लागू असेल. 

टी 20 पॉवर प्लेचे नियम बदलले

आयसीसीनं टी 20 क्रिकेटमधील पॉवरप्लेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. पाऊस किंवा अन्य कारणांमुळं मॅचमधील ओव्हर कमी केल्यास पॉवरप्लेच्या ओव्हर देखील कमी केल्या जाणार आहे.

ओव्हर आणि पॉवरप्ले 

5 ओव्हरची मॅच : 1.3 ओव्हरचा पॉवरप्ले6 ओव्हरची मॅच : 1.5 ओव्हरचा पॉवरप्ले7 ओव्हरची मॅच : 2.1 ओव्हरचा पॉवरप्ले  8 ओव्हरची मॅच : 2.2 ओव्हरचा पॉवरप्ले9 ओव्हरची मॅच : 2.4 ओव्हरचा पॉवरप्ले10 ओव्हरची मॅच : 3 ओव्हरचा पॉवरप्ले11 ओव्हरची मॅच : 3.2 ओव्हरचा पॉवरप्ले12 ओव्हरची मॅच : 3.4 ओव्हरचा पॉवरप्ले13 ओव्हरची मॅच : 3.5 ओव्हरचा पॉवरप्ले14 ओव्हरची मॅच : 4.1 ओव्हरचा पॉवरप्ले15 ओव्हरची मॅच : 4.3 ओव्हरचा पॉवरप्ले16 ओव्हरची मॅच : 4.5 ओव्हरचा पॉवरप्ले17 ओव्हरची मॅच : 5.1 ओव्हरचा पॉवरप्ले18 ओव्हरची मॅच : 5.2 ओव्हरचा पॉवरप्ले19 ओव्हरची मॅच : 5.4 ओव्हरचा पॉवरप्ले

आयसीसीनं गेल्या काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये 35 ओव्हरनंतर बॉल बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळं डेथ ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तर बाऊंड्रीवर कॅच घेण्यासंदर्भातील नियम देखील आयसीसीनं बदलले आहेत.