ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाजांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, ही भारतीय संघासाठी चांगली वेळ आहे, असं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) यांना वाटतंय. आयपीएलमध्ये अनेक युवा गोलंदाजानं प्रभावित केलं आहे. यातील काहींना आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. 


आयपीएलमध्ये युवा गोलंदाजांची दमदार कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडलीय. यात सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकासह अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांसारख्या युवा गोलंदाजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या हंगामात उमरान मलिकनं सातत्यानं 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केलीय. त्याच्या गोलंदाजीचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतूकही केलंय. 


आयपीएलमुळं युवा गोलंदाजांना कौशल्य दाखवण्याची संधी
आयपीएलमुळं अनेक युवा गोलंदाजांना क्रिडाविश्वावर छाप सोडण्याची संधी मिळाल्याचं राहुल द्रविडनं म्हटलं आहे. "आयपीएलमुळं अनेक युवा गोलंदाजांना कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोन केलं. आगामी काळात भारतीय क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत." दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकात उमरान मलिकाला खेळण्याची संधी मिळावी, अशी इच्छा इरफान पठाणं बोलून दाखवली. 


आठ महिन्यात भारताचे सहा कर्णधार बदलले
"भारतानं गेल्या आठ महिन्यात सहा कर्णधार बदलले आहेत. जेव्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली, तेव्हा आमचं असं काही नियोजन ठरलं नव्हतं. परंतु, भारत खेळत असलेल्या सामन्यांची संख्या पाहता, ही अधिक महत्वाचं ठरतं. तुम्हाला वेळोवेळी निर्णयाचा स्वीकार करावा लागतो. वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करणे आव्हानात्मक होतं", असंही राहुल द्रविडनं म्हटलं होतं. 


हे देखील वाचा-