IND vs NZ, Shubhman Gill : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubhman Gill) न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात तुफान फलंदाजी करत दमदार असं शतक झळकावलं. त्याचं हे टी20 क्रिकेटमधील पहिलं शतक असून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शतक आणि द्विशतक ठोकल्यावर आता टी20 सामन्यातही शुभमननं शतक ठोकलं आहे. शुभमननं सामन्यात 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकार मारले. शुभमन गिलच्या शानदार शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 234 धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडसमोर मालिका जिंकण्यासाठी 235 धावांचे लक्ष्य आहे. दरम्यान गिलच्या या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर शुभमन गिल ट्रेंड करत आहे.


अनेक मीम्सही नेटकरी शेअर करत आहेत, यातील खास मीम्स पाहू...


































विशेष म्हणजे या शतकासह शुभमन तिन्ही क्रिकेट फॉर्माटमध्ये भारतासाठी शतक ठोकणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विराजमान झाला आहे. पण सर्वांच्या तुलनेत शुभमनची नाबाद 126 ही धावसंख्या सर्वाधिक आहे. नुकतच आशिया कपमध्ये विराट कोहलीनं शतक ठोकल्यावर त्याने या पंगतीत स्थान मिळवलं होतं. ज्यानंतर आता शुभमन गिलनंही या क्लबमध्ये जागा मिळवली आहे.


भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे



  • सुरेश रैना

  • रोहित शर्मा

  • केएल राहुल

  • विराट कोहली

  • शुभमन गिल


हे देखील वाचा-