India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) तिसऱ्या टी20 सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Cricket Stadium) सुरुवात झाली आहे. टॉस जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता भारताने गोलंदाजी विभागात एक बदल करत केला असून न्यूझीलंडने देखील अंतिम 11 मध्ये एका बदलासह संघ मैदानात उतरवला आहे. भारतीय संघाने वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) संधी देत युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) विश्रांती दिली आहे. तर न्यूझीलंडने जेकॉब डफीला बेंचवर बसवत बेन लिस्टर याला संधी दिली आहे.
दरम्यान उमरान याला पहिल्या टी20 सामन्यात संधी मिळाली होती. पण त्यात त्याने बऱ्याच धावा दिल्या होत्या. केवळ एकाच षटकात त्याला 16 रन पडले होते. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली नव्हती,पण आज सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्यानं आज उमरानला संधी दिली गेली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...
भारतीय संघ- शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग
न्यूझीलंडचा संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर
दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना
अहमदाबादमध्ये होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड संघाला दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकायची आहे. किवी संघाने 2012 साली भारतीय भूमीवर शेवटची टी-20 मालिका जिंकली होती. किवींनी टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला होता. दुसरीकडे, जर टीम इंडिया तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ती आपल्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा टी-20 मालिका जिंकेल. भारताने याआधी 2017 आणि 2021 मध्ये न्यूझीलंडला त्याच्या भूमीवर टी-20 मालिकेत पराभूत केलं आहे.
हे देखील वाचा-