Shubhman Gill Record : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. ज्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं 235 धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं आहे. भारती संघाकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 63 चेंडूत 126 धावा करत शतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि एक द्वीशतक ठोकल्यावर आता टी20 मालिकेतही त्याने एक शतक पूर्ण केलं आहे. ज्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात येत आहे.


आजचा टी20 सामना मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आहे. मालिकेतील पहिल सामना किवी संघाने 12 धावांनी तर दुसरा सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकला. ज्यानंतर आज होणारा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. संपूर्ण सामन्याचा विचार करता सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठी धावसंख्या उभी राहत असल्यानं भारतानं हा निर्णय घेतला आणि सलामीवीर शुभमनच्या तुफान फॉर्मच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली देखील. भारतानं 20 षटकांत 4 गडी गमावत 234 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यावेळी सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन बाद झाला. मग गिलसोबत राहुल त्रिपाठीनं स्फोटक खेळी केली. 44 धावा करुन राहुल तंबूत परतला. मग सूर्यकुमारही 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॅप्टन पांड्यानं गिलसोबत डाव सावरला. गिलनं तुफान फटकेबाजी करत 54 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 126 धावा केल्या. पांड्यानं 30 तर हुडानं 2 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळे आता न्यूझीलंडला 120 चेंडूत 235 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 






भारताची विजयी साखळी न्यूझीलंड तोडणार?


अहमदाबादमध्ये होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड संघाला दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकायची आहे. किवी संघाने 2012 साली भारतीय भूमीवर शेवटची टी-20 मालिका जिंकली होती. किवींनी टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला होता. दुसरीकडे, जर टीम इंडिया तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ती आपल्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा टी-20 मालिका जिंकेल. भारताने याआधी 2017 आणि 2021 मध्ये न्यूझीलंडला त्याच्या भूमीवर टी-20 मालिकेत पराभूत केलं आहे.


हे देखील वाचा-