Shubhman Gill in IND vs WI Series : भारतीय संघाने वेस्ट इंडीजला (India vs West Indies) त्यांच्याच भूमीत 3-0 च्या फरकाने मात दिली. यावेळी मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला (Shubhman Gill) मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. गिलने तीन सामन्यात 205 धावा ठोकल्या असल्या तरी अखेरच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे त्याचं पहिलं-वहिलं एकदिवसीय शतक पूर्ण झालं नाही. विशेष म्हणजे त्याने नाबाद 98 धावा केल्याने केवळ 2 धावांमुळे तो शतकापासून दूर राहिला. गिलचं शतक झालं नसलं तरी त्याचं कौतुक सर्वचजण करत आहेत.
भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील तीन सामन्यात मिळून शुभमनने दोन अर्धशतकांच्या मदतीने तब्बल 205 रन केले. यावेळी पहिल्या सामन्यातही त्याने संघाला एक दमदार सुरुवात करुन दिली. ज्यामध्ये त्याने 53 चेंडूत 64 रन केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तो 49 चेंडूत 43 धावा केल्या. अखेरच्या सामन्यातही शुभमनने 98 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या. या सर्व सामन्यात त्याने अनेक क्लासिक शॉट खेळले. दरम्यान 3 मॅचमध्ये 205 धावा केल्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अनेकांनी ट्वीट करत त्याचं कौतुक केलं आहे.
शुभमन NOT OUT 98
भारत आणि वेस्ट इंडीजमधील अखेरच्या सामन्यात सुरुवातीपासून पावसाचा व्यत्यय येत होता. सामना बऱ्याचदा थांबवण्यातही आला आधी 40 ओव्हरचाा खेळ करण्यात आला, त्यानंतर भारताचा डाव 36 षटकांत थांबवून वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करण्याचं टार्गेट दिलं. पण या साऱ्या व्यत्ययात भारताचा सलामीवीर शुभमन गिल अगदी संयमी खेळ दाखवत होता. त्याच्याच जोरावर भारत पावसाच्या व्यत्ययातही इतकी धावसंख्या उभा करु शकला. शुभमनने 98 चेंडूत नाबाद 98 रन केले. यावेळी त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याने यावेळी 104 मीटर लांब असा एक षटकारही खेचला.
हे देखील वाचा -
- IND vs WI, 3rd ODI, Match Highlights : शानदार! भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार