Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव, जागतिक क्रिकेटमध्ये सध्या खेळणाऱ्यांमध्ये सर्वाधिक धावा नावावर असणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). पण हाच कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत असल्याने आता त्याला गेल्या सात वर्षांतील सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारीवर जावं लागलं आहे. आयसीसीने नुकतीच एकदिवसी खेळाडूंची क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर केली. ज्यात विराट एका स्थानावरुन घसरला असून थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) एका स्थानाची घसरण झाल्याने तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
विराट-रोहित या दोघांना मागील काही काळापासून खास कामगिरी करता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध दोघेही फ्लॉप ठरले. आता वेस्ट इंडीजविरुद्ध दोघेही विश्रांतीवर असून यामुळे त्याच्या आयसीसी रँकिंमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली 774 गुणांसह आता पाचव्या स्थानावर तर रोहित शर्मा 770 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 892 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावरही पाकिस्तानचा इमाम हुल् हक 815 गुणांसह आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे डस्सेन आणि डी कॉक अनुक्रमे 789 आणि 784 गुणांसह विराजमान आहेत.
कोहलीची धावांसाठी धडपड
आयसीसी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी विराट पोहोचल्याने मागील 7 वर्षांतील ही त्यांची सर्वात खराब क्रमवारी आहे. ऑक्टोबर 2015 पासून तो टॉप 4 मधून कधीच बाहेर नव्हता. पण आता त्याला थेट पाचव्या स्थानी जावे लागले आहे. विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.
हे देखील वाचा-
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार
- IND vs WI : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज, एक विजय आणि 39 वर्षांत पहिल्यांदाच करणार 'ही' कामगिरी
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी