Indian Dressing Room Video : भारत आणि वेस्टइंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. या विजयासोबत भारताने 39 वर्षांत प्रथमच वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यामुळे या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाने तुफान जल्लोष केला. कोच राहुल द्रविडने कर्णधार शिखर धवन तसंच इतर खेळाडूंचं भरभरुन कौतुक केलं.


द्रविड म्हणाला,''संघात या सामन्यांवेळी अधिक युवा खेळाडूच होते. असं असतानाही अगदी दमदार प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळालं. भारताच्या विजयात शुभमन गिलचा मोठा वाटा होता. त्याने सर्व सामन्यात दमदार खेळ दाखवला, अखेरच्या सामन्यातही नाबाद 98 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.'' द्रविडनंतर कर्णधार शिखर धवनने देखील सर्व खेळाडूंचं कौतुक केलं. तो म्हणाला,''मी संपूर्ण संघासह सपोर्ट स्टाफचंही अभिनंदन करु इच्छितो. बॅटिंग युनिटसह बोलिंग युनिटनेही चांगलं प्रदर्शन केलं.'' धवनने खेळाडूंचा उत्साहव वाढवण्यासाठी चॅम्पियन-चॅम्पियन अशा घोषणाही दिल्या.


पाहा व्हिडीओ-






सामन्याचा लेखाजोखा


सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकांत 257 रन करायचे होते. 


35 षटकात 257 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या षटकातच  सिराजने दोन दमदार झटके दिले. त्यानंतर एक-एक करत गडी बाद होत गेले. वेस्ट इंडीजकडून कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. पण भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर कोणाचाच निभाव लागला नोही. ज्यामुळे अखेर  भारकडून चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि प्रसिध कृष्णा यांनी एक-एक विकेट घेतली. 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे. नाबाद 98 धावा ठोकणाऱ्या शुभमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


हे देखील वाचा -