Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली?; बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, मला...
Shreyas Iyer: ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरची इंडिया अ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Shreyas Iyer: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारताचा संघही (Team India) जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरचं भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित मानलं जात होतं. परंतु श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) बीसीसीआयला पत्र लिहित कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरची इंडिया अ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी मालिकेतूनही श्रेयस अय्यरने माघार घेतली आहे. इंडिया एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, अय्यरने बीसीसीआयला पत्र लिहून पाठीच्या समस्येमुळे रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं आहे.
🚨 SHREYAS IYER WANTS A BREAK. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 23, 2025
- Iyer has written to the BCCI that he'll be taking a break from red ball cricket due to back stiffness and fatigue issues. (Express Sports). pic.twitter.com/MElCnAeBbh
श्रेयस अय्यरला पाठीच्या समस्येचा त्रास- (Shreyas Iyer suffers from back problem)
श्रेयस अय्यरने बीसीसीआयला कळवले आहे की, तो येत्या काही महिन्यांत रेड बॉल क्रिकेट खेळणार नाही. आगामी काही दिवसांत श्रेयस अय्यर त्याच्या प्रकृतीचे मूल्यांकन करण्यासाठी त्याच्या फिजिओ आणि ट्रेनरचा सल्ला घेईल. श्रेयस अय्यरला बऱ्याच काळापासून पाठीच्या समस्येचा त्रास आहे. पाठीच्या समस्येमुळे आयपीएल 2023 च्या हंगामातूनही श्रेयस अय्यरने माघार घेतली होती.
श्रेयस अय्यर रेड बॉल क्रिकेटपासून दूर- (Shreyas Iyer away from red ball cricket)
श्रेयस अय्यर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही दिसणार नाही. श्रेयस अय्यरने काही काळ रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले. श्रेयस अय्यरने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. श्रेयस अय्यरने 14 कसोटी सामन्यांमध्ये 811 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून कसोटी पदार्पण केले.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा संभाव्य कसोटी संघ (India's likely squad vs West Indies) -
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नारायण जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अक्षर पटेल.





















