IND vs WI : भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. सामन्यात 54 धावा करत त्याने अर्धशतक पूर्ण केलं असून यासोबत त्याने 1001 धावा नावे केल्या आहेत. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही तो एक खास रेकॉर्ड करु शकतो. श्रेयस केवळ दोन चौकार लगावताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 चौकार पूर्ण करु शकतो. सध्या त्याच्या नावावर 28 एकदिवसीय सामन्यात 98 चौकार नावावर आहेत. 


पहिल्या सामन्यात श्रेयसने 54 धावा करत दमदार अर्धशतक ठोकलं, पण याच वेळी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा देखील पार केला. हा टप्पा वेगवान पद्धतीने पार करणारा तो तिसरा भारतीय ठरला. याआधी कोहली आणि धवन यांनी 24 डावात हा टप्पा पार केला होता. ज्यानंतर आता श्रेयस अय्यरने 25 डावांत हा टप्पा पर करत या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात दोन चौकार ठोकताच श्रेयस 100 एकदिवसीय़ चौकार नावे करेल.


भारत मालिकेत आघाडीवर


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.


हे देखील वाचा-