Asia Cup : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला संघात स्थान मिळालं नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे 2018 साली झालेल्या अखेरच्या आशिया कपमध्ये भारताला जिंकवून देण्यात शिखरचाच सिंहाचा वाटा होता. त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता. पण यंदा त्याच शिखरला संघात साधं स्थानही मिळालेलं नाही. 

भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सात वेळा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. दरम्यान अखेरचा आशिया कप 2018 साली झाला होता, तो देखील भारताने जिंकला असून यावेळी सलामीवीर शिखर धवनने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने स्पर्धेत दोन शतकं ठोकली होती. यावेळी त्याने पाकिस्तान विरुद्धच्या दोन सामन्यांत एका मॅचमध्ये 114 तर एकामध्ये 46 रन केले होते. याशिवाय भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्यातही 127 धावा ठोकल्या होत्या. तसंच भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यांमध्ये एका मॅचमध्ये 40 तर एकात 15 रन केले होते. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावरच त्याला मालिकावीर हा पुरस्कार देखील मिळाला होता. पण मागील काही वर्षात अधिक संधी न मिळाल्याने शिखर आता संघातही फार कमी वेळा दिसतो. अलीकडे काही दौऱ्यांसाठी त्याला रोहित, राहुल यांच्या अनुपस्थितीत कर्णधारपद मिळालं होतं. पण आशिया चषकाच्या संघात मात्र त्याला स्थान मिळालं नाही.

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. 

राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल

कसं आहे वेळापत्रक?

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-